प्रशासकिय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार सोहळा : सौ प्रतिमा सस्ते , सौ प्रमिला पवार यांचा गौरव
धाराशिव,दि.२३:
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्कार 2025 हा ग्रामपंचायत कार्यालय येडशीच्या वतीण ग्रामीण क्षेत्र आंतर्गत दोन महिलांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची निवड 15 ऑगस्ट रोजी सौ.प्रतिमा महादेव सस्ते व सौ.प्रमिला हरिश्चंद्र पवार यांची प्रस्तावीत प्रस्तावानुसार पडताळाणी करून जाहिर करण्यात आला होता व त्याचे वितरण सोहळा 22/8/2025 रोजी करण्यात आला .
हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक,आरोग्य, महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 2 महिलांना देण्यात येतो. यामध्ये पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल,श्रीफळ व रोख रक्क्म देऊन सन्मान करण्यात येते याच स्वरूपात सौ प्रतिमा सस्ते व सौ प्रमिला पवार यांना देऊन सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंच डॉ सोनिया पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर ग्रामविकास अधिकारी गणेश भगत यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला .
पुरस्काराचे वितरण सरपंच डॉ.सोनिया पवार व उपसरपंच स्वाती शेळके यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात कु जान्हवी सस्ते हिने हार्मोनियम वादन करत प्रार्थना सादर केली.
यावेळी माजी उपसरपंच प्रिया सस्ते,डॉ प्रशांत पवार, तसेच येडशी गावातील आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका व गावातील महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .
यावेळी बोलताना पुरस्कारकर्त्या सौ प्रतिमा सस्ते यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार का दिला जातो व त्याच्याबद्दल माहिती देत आपले मनोगत मांडले.तर सौ प्रमिला पवार या अशा कार्यकर्त्यांच्या सुपरवा्यझर असून हा माझा सत्कार नसून माझ्या संपूर्ण टीमचा हा सत्कार आहे आसे मत मांडले. तर अशा कार्यकर्त्यां सीमा कदम यांनी माझ्या गावच्या लेक व सून यांचा सत्कार हा सन्मान म्हणजे आमचा सत्कार आहे आसे मनोगत व्यक्त करत कौतुक व आभिनंदन केले.माजी उपसरपंच प्रिया सस्ते यांनी शुभेच्छा देत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले .
अध्यक्षीय समारोपात सरपंच डॉ.सोनिया पवार यांनी सस्ते व पवार यांनी सामाजिक कार्य तेवत ठेऊन समाजहित साधावे आसे मनोगत व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा देत गावच्या वतीने अभिनंदन केले . शेवटी ग्रामविकास अधिकारी गणेश भगत यांनी आभार मानले .