येडोळा शिवारात  पारंपारिक  बैल पोळा सण शेतकऱ्यांनी केला उत्साहात साजरा 

नळदुर्ग,दि.२२:

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे  पारंपारिक  बैल पोळा सणानिमित्त  बैलाला सजवुन त्याची पुजा, अर्चा करुन , कर तोडून शेतकऱ्यांनी हा सण उत्साहात साजरा साजरा केला. 

मानकरी  प्रभाकर पाटील यांचे चिरंजीव समर्थ प्रभाकर पाटील यांचे हस्ते कर तोडण्यात आली. यावेळी शाहूराज भाऊराव पाटील , दिनकर भाऊराव पाटील, प्रभाकर युवराज पाटील , धनराज शाहू राज पाटील , पद्माकर मधुकर पाटील  , खंडेराव भास्कर पाटील,  रवी भास्कर पाटील , आदित्य दिनकर पाटील , ओंकार प्रभाकर पाटील , समर्थ प्रभाकर पाटील, दिलीपसिंग चव्हाण , बुधवंत चव्हाण, प्रथमेश चव्हाण, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते . पाटील परिवारानी पोळा सण उत्साहात साजरा केला . याप्रसंगी ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top