माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी कुटुंबासमवेत केला  बैलपोळा सण उत्साहात  साजरा; अणदुर परिसरात बैलपोळा सण उत्साहात 

अणदूर दि.22 चंद्रकांत हगलगुंडे

तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. यंदा पावसाळापूर्वीच वरून राजाने शेतकऱ्यांना भरभरून दिलासा दिला असला तरी खरीप पिके मात्र हातचे गेल्याने शेतकरी हातभल झाला असून रब्बीचे काय होणार याबाबत मात्र चिंताग्रस्त असल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील अणदूर शिवारात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व त्यांचे चिरंजीव बाबुराव चव्हाण, सुनील चव्हाण सह नातवंडाने  तसेच खंडोबाचे पुजारी गणेश मोकाशे यांनीही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात परंपरागत पद्धतीने साजरा केला.

माजी मंत्री चव्हाण यांनी सहकुटुंब शेतात जाऊन बैलांचे पूजाअर्चा करून बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळून शेतकरी जगला तरच जग जगेल यासाठी शासनाने शेतकऱ्यांप्रती सहानुभूती बाळगुन अधिकाधिक मदत करण्याची अपेक्षा केली.

सध्या शेती हा जुगाड व्यवसाय झाला असून बैलांची जागा यंत्राने घेतल्यामुळे, त्याची संख्या आहे नगण्य होताना दिसत आहे. बाई शिवाय घराला घरपण नाही, तसेच शेतीला बैलाशिवाय बाळस नाही. ही म्हण तंतोतंत खरी असून बैल खंडीन नसला तरी किमान जोडणी तर असावा असे जानकार शेतकऱ्यातून ऐकावयास मिळते. पंचक्रोशीत बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 
Top