नळदुर्ग  शहरात ७९ स्वतंत्रदिन विविध ठिकाणी उत्साहात साजरा 

नळदुर्ग,दि.१५:

नळदुर्ग  शहरात  सर्वत्र शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी  ७९ वा स्वातंत्र्यदिन भरगच्च कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शहरातुन शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम ऐतिहासिक किल्ल्यात नळदुर्गचे अपर तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या हास्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सचिन यादव, पोलिस कर्मचारी, अनेक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कर्मचारी, महसुल विभागाचे कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

नळदुर्ग नगरपालिका कार्यालय याठिकाणी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी माजी सैनिक भारत जाधव, प्रकाश रगबले, प्रकाश मोरडे,  विश्वनाथ हात्ते, दोमोदर सोमवंशी वीर पत्नी लक्ष्मी गायकवाड , संध्याताई भुमकर, माजी नगरसेविका छमाताई राठोड, , माजी नगरसेवक  बसवराज धरणे, उपाध्यक्ष किशोर नळदुर्गकर, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, कमलाकर चव्हाण, नय्यर जहागिरदार,  तन्वीर खतीब, दत्तात्रय कोरे, स्वप्निल काळे, मुद्दसर शेख , पत्रकार  भगवंत सुरवसे, शिवाजी नाईक, अयुब शेख, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी , प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

तसेच नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालय येथे  वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंचल संभाजीराव बोडके,  पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सचिन यादव , चावडी चौकात ग्राम महसुल अधिकारी अंकाक्षा वाघमारे, सुहास पाटील, हुतात्मा स्मारक याठिकाणी नायब तहसिलदार पवन भोकरे यांच्या हास्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

एस.टी.बस स्थानकात वाहतुक नियंत्रक महेश डुकरे , अनिल हांडे यांच्या हास्ते, लोकमान्य सार्वजनिक वाचनालय  येथे शशिकांत माधवराव पुदाले यांच्या हस्ते,भवानीनगर राजकुमार डुकरे चौकात भोई समाजाचे कोषाध्यक्ष रवी  सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील सर्व खासगी शाळा,जि.प.शाळा, महाविद्यालय,  बँकासह अनेक ठिकाणी स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.


 
Top