भारतीय जनता पार्टी कार्यालयात नुतन जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा नळदुर्ग ग्रामीण व शहर मंडळाच्या वतीने सत्कार
नळदुर्ग,दि.१६ :
नळदुर्ग येथे शुक्रवार दि.१५ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून नुतन जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा नळदुर्ग ग्रामीण व शहर मंडळाच्या वतीने सत्कार
तुळजापूर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणीत निवड झालेले किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष बोबडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता राजमाने, जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, जिल्हा चिटणीस सौ अंजलीताई बेताळे,अरविंद पाटील यांचा नळदुर्ग ग्रामीण अध्यक्ष रंजनाताई राठोड व शहर अध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंडल पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला .
पुर्वीच्या काळी सायकलवरुन फिरुन भाजप पक्ष वाढीसाठी अहोरात्र काम करणा-या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला.येणा-या काळात सर्वांनी मिळुन एकदिलाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे सांगुन सर्व नुतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस भाजपचे नेते सुशांत भुमकर यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रभाकर मुळे,दीपक आलुरे, साहेबराव घुगे,दत्ता राजमाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ,तांडा सुधार अशासकीय सदस्य विलास राठोड , माजी जिल्हा सरचिटणीस दिपक आलुरे,जेष्ठ नेते प्रभाकर मुळे, .दिपक घोडके, धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, किशोर बनसोडे,भिवाजी इंगोले, महादेव पाटील, ,सचिन घोडके, महादेव सालगे,अतुल भोसले , सरपंच युवराज पाटील, मल्लिनाथ गावडे, सर्वेश्वर पाटील, पद्माकर जेवळे,लक्ष्मी सुरवसे ,अंगद जाधव,दयानंद मुडके, शिवकुमार स्वामी,उमेश गोरे,विक्रांत दुधाळकर, विठ्ठल घंटे ,ज्ञानेश्वर पाटील,कल्याण बिराजदार,योगीराज जळकोटे, विवेक सावंत,नूर भाई ,महादेव माने ,शरणाप्पा कबाडे,सचिन वाघोले, उमेश नाईक ,अक्षय भोई, महादेव वडजे, विक्रम सांगवे, धनराज सालगे,अनिल पवार ,दामाजी राठोड,अनिकेत घोडके, संदीप गायकवाड,गौस शेख, बागवान,महादेव माने,आदि शक्तिकेंद्र प्रमुख,बूथ प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोटे,प्रस्ताविक विलास राठोड ,तर आभार भिवाजी इंगोले यांनी मांडले