भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्त सांडणाऱ्या विरांचे स्मरण ठेवणे हे आपले कर्तव्य - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण 

नळदुर्ग,दि.१५: डॉ. दिपक जगदाळे 

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या विरांचे विस्मरण करण्याची दक्षता आजच्या पिढीने घ्यावी असे मत बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण  यांनी व्यक्त केले. 

नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आज ७९ व्या. स्वातंत्र्य दिनानिम्मित आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या  हस्ते व  प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, डॉ. अशोक कदम ,लेफ्टनंट कमांडर डॉ.आतिश तिडके डॉ. कपिल सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. 

तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील एनसीसी विभागात प्राविण्य प्राप्त विद्यार्थांना  प्रमाणपत्राचे वाटप करून  सन्मानित  करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top