श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

तुळजापूर,दि.१५:

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे राष्ट्रभक्तीच्या उत्साही वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. या प्रसंगी मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले आणि उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला. मंदिर संस्थानचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिर संस्थानच्या परिसरात सजावटीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच, संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रप्रेम, शिस्त आणि भक्तिभाव यांचे उत्तम प्रतीक ठरला.
 
Top