माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांचे निधन 
नळदुर्गच्या विकासासाठी तळमळीने काम करणारे व्यक्तिमत्व गमावले - आमदार राणाजगजितसिंह पाटील 

नळदुर्ग ,दि.११:

 नळदुर्ग नगरीचे माजी नगराध्यक्ष  नगराध्यक्ष उदय अंबादासराव जगदाळे ( वय ६५ वर्ष ) यांचे आज गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे रुग्णालयात उपचारादरम्यान  निधन झाले.हे वृत्त नळदुर्ग येथे समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
दिवंगत माजी उपनगराध्यक्ष  सुधीर जगदाळे यांचे ते लहान बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे. उदया शुक्रवार दि. १२ सप्टेंबर  रोजी सकाळी ११ वाजता नळदुर्ग येथील आलियाबाद स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. डॉ दिपक जगदाळे यांनी दिली.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे शोक संदेश 

नळदुर्ग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते उदयभाऊ जगदाळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याचे वृत्त अत्यंत धक्कादायक असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  शोक व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यांच्या निधनाने नळदुर्गच्या विकासासाठी तळमळीने काम करणारे व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांची उणीव आपल्याला नेहमीच भासत राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि जगदाळे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना...

 
Top