अदिवासी विकास पर्यटन व उद्योग मंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी केले  चव्हाण कुटुंबाचे सांत्वन 

मुरूम,दि.१४:

उमरगा तालुक्यातील नाईक नगर (मुरुम) येथे शनिवारी आत्महत्या केलेल्या पवन चव्हाण यांच्या कुटूंबाची अदिवासी विकास पर्यटन व उद्योग विभागाचे  राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावा या मागणीसाठी मुरूम मधील नाईक नगर तांड्यातील 32 वर्षीय पवन चव्हाण याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली होती .या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी  रविवारी दुपारी राज्याचे अदिवासी विकास पर्यटन व उद्योग विभागाचे  राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी उमरगा तालुक्यातील नाईकनगर (मुरुम ) तांडा येथे प्रत्यक्ष येऊन मयत पवन चव्हाण  यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली व कुटुंबातील व्यक्तींना मदत देऊन पुढील भविष्यासाठी मयत पवन यांच्या  पत्नीला सरकारी नौकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न असेल असे  आश्वासन दिली आहेत.

यावेळीमयतची पत्नी कृपाली पवन  चव्हाण, आई द्रोपदी चव्हाण, आमदार प्रवीण स्वामी,जेष्ठ नेते माणिकराव राठोड , तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड ,  प्रवीण पवार,  माजी नगरसेवक निरंजन राठोड , मनोज चव्हाण, सरपंच युवराज राठोड, तहसीलदार  येरमे , माजी जि.प. सभापती बापुराव राठोड,  सुरेश बिराजदार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी सभापती प्रकाश चव्हाण, वैभव जाधव, बाबुराव जाधव, शेषेराव चव्हाण, हारिष जाधव, लक्ष्मण राठोड, लालसिंग राठोड, दिग्विजय शिंदे, विद्यानंद राठोड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
 
Top