तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी परिसरात अतीवृष्टी, अनेक घरांत पाणी शिरले, शेती पाण्याखाली
नळदुर्ग,दि.१३:
उडीद व इतर पिकाची काढणी या भागात सर्वत्र सुरू आहे. पावसामुळे त्यात व्यत्यय आले असुन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
शनिवार रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील अनेक कुटूंबाच्या घरात पाणी प्रवेश करून धान्य, फर्निचरचे मोठे नुकसान झाले. शेतातील पिकेही पाण्याखाली गेली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी गावकऱ्यांनी केल्याची माहिती योगेश हांजगे यांनी दिली.
दि.९ सप्टेंबर रोजी गुळहळ्ळी शिवारात मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळीही घरात पाणी शिरले होते.