येणेगुर ग्रामपंचायतमधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करा; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमुखी मागणी
मुरूम,दि.१३:
उमरगा तालुक्यातील येणेगुर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने शासनाच्या निधीचा गैरवापर करून विविध कामात भ्रष्टाचार केली आहेत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी आयोजित ग्रामसभेत केली आहेत
येणेगुर ग्रामपंचायत येथे दिनांक 11 रोजी ग्रामसभा घेण्यात आली यावेळी अनेक विषय वादळी ठरल्या आहेत.विद्यमान सरपंच रेखा गुंजोटे आणि ग्रामसेवक सदाशिव इंगळे तसेच सर्व सदस्यांना नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावा लागला .याप्रसंगी विविध विकास कामातील भ्रष्टाचार तसेच आर्थिक व्यवहारातील अनियमितता आणि गलथान कारभार याबद्दल ग्रामस्थांनी विचारणा करत ग्रामसेवक व सरपंच यांना धारेवर धरले विशेष म्हणजे भाजपचे माजी सरचिटणीस सागर पाटील यांनी ग्रामसभेत पुराव्यासह भ्रष्टाचाराचे अनेक उदाहरणे ग्रामस्थांसमोर आणून दिले . यामध्ये गावात बसवण्यात आलेल्या हायमस्ट लाईटचे काम तसेच शुद्ध पाणी प्लॅन्ट दुरुस्ती व नवीन कार्यान्वित करणे त्याचप्रमाणे सी सी टीव्ही आणि डस्टबिन बसविणे यासह अन्य कामातील गैर व्यवहार आणि कारनामे पुराव्यासह समोर आणले त्यामुळे ग्रामस्थामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कारभाराबद्दल प्रचंड रोष दिसून आले दरम्यान झालेल्या सर्व कामाची आणि गैर व्यवहाराची चौकशी व्हावी आणि गुन्हे दाखल व्हावेत यासाठी ग्रामस्थांनी ठराव मांडला