धाराशिव जिल्ह्यात दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत "सेवा पंधरवडा" चे आयोजन; नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन 

धाराशिव,दि.१९:
धाराशिव जिल्ह्यात दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत "सेवा पंधरवडा" साजरा करण्यात येत आहे. पाणंद रस्ते विषयक मोहीम, "सर्वांसाठी घरे" या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहीम राबविण्यात येत असुन त्याकरिता 
नागरीकांनी  अर्ज सादर करण्याचे आवाहन धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय  क्र. मराअ -२०२५/प्र.क्र.६३ (ई ऑफिस क्र.१२ ९६३७८)/समन्वय दि. ०१ दि.०१ सप्टेंबर, २०२५ अन्वये महसूल विभागामार्फत राज्यात दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये 'निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे जन्मदिन दि. १७.०९.२०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दि. ०२.१०.२०२५ या कालावधीमध्ये "सेवा पंधरवडा" साजरा करणेबाबत नमूद केलेले आहे.

उक्त शासन निर्णयात नमूद प्रमाणे दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार यांना महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी खालील प्रमाणे विशेष मोहीम/कार्यक्रम/उपक्रम/शिबीरे/महसूल अदालत यांचे आयोजन करण्यास सूचित केले आहे.

त्यानुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये शासन निर्णयामध्ये नमूद सूचनांप्रमाणे पुढील प्रमाणे जिल्हायातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयामध्ये दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये "सेवा पंधरवडा" साजरा करण्यात येणार आहे.

दि. 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पहिल्या टप्प्यात पानंद रस्ते विषयक मोहीम, दि. 23 सप्टेंबर हे दि. 27 सप्टेंबर दुसऱ्या टप्प्यात "सर्वांसाठी घरे" या उपक्रमांतर्गत शासनाकडून ( ग्राम विकास विभाग, नगर विकास विभाग, महसूल विभाग विकास) निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदीची अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहीम राबविणे, दि. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर तिसऱ्या टप्प्यात  जनता दरबार व पाणंद रस्त्याचे मजबुतीकरण करणे.

याकरिता जिल्हायातील समस्त नागरीकांनी उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे धाराशिव  निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

 
Top