स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी 

नळदुर्ग,दि.१९:

 शिवाजी पार्क दादर मुंबई येथे असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व  मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात नराधमांनी लाल रंग टाकून विंटबना 

 करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा तीव्र निषेध करुन नळदुर्ग व ग्रामीण भागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने त्या नराधमावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे नळदुर्ग पोलीसाना निवेदन  देण्यात आले. 

या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख डॉ जितेंद्र कानडे, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, तालुका संघटक कृष्णात मोरे, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, माजी तालुकाप्रमुख बाळासाहेब घोडके, शहरप्रमुख संतोष पुदाले, उपसरपंच प्रशांत नवगिरे, उपशहरप्रमुख शाम कणकधर, सोमनाथ म्हेत्रे, युवासेनाप्रमुख नेताजी महाबोले, विभागप्रमुख अनिल छत्रे,शाखाप्रमुख दत्ता भोसले,नितीन राठोड  अविनाश हिपरगे, चंदर सगरे, कुमार मोरे,पप्पू कदम राहुल भोसले यांच्या स्वक्षऱ्या आहेत.
 
Top