नळदुर्ग : बोरी नदीच्या काठावरील श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
नळदुर्ग,दि.१८ : शिवाजी नाईक
शहरातील शिवकालीन ऐतिहासिक श्री. जगदंबादेवी मंदिरात (अंबाबाई) नवरात्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२२ सप्टेंबर सोमवार रोजी पासुन नवरात्रारंभ , सकाळी ६ वाजता देवीस अभिषेक, पुजा करुन सकाळी ८ वाजता घटस्थापना होणार आहे.
नळदुर्ग बोरी नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात श्री अंबाबाईचे मंदिर आहे. नवराञोत्सव काळात दररोज पहाटे ५.३० वाजता अभिषेक,सायंकाळी सात वाजता महाआरती व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. नवराञोत्सवा निमित्त मंदिराच्या सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारपासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित करण्यात आले आहे. दि.२३ सप्टेंबर मंळवार रोजी सायंकाळी ५ वाजता संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ,नळदुर्ग महिला भजनी मंडळ, बाळकृष्ण महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. तर बुधवार दि.२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आराधी गिताचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दि.२५ रोजी सायंकाळी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, शुक्रवार दि. २६ रोजी सायंकाळी पाच वाजता रांगोळी (मुलींसाठी खुला गट) स्पर्धा, शनिवार दि.२७ रोजी महिलांकरिता उखाणे ६.३० ते ७ वाजता, रविवार दि.२८ रोजी ५ वाजता महिला व युवतींकरिता गरबा (दांडिया) कार्यक्रम, तर किशोरवयीन मुलींशी सौ उज्वला श्रीकृष्ण मसलेकर धाराशिव हे सुसंवाद साधणार आहेत.सोमवार दि.२९ रोजी दुपारी ४ ते ५ कुंकूमार्जन व सायंकाळी ६ वाजता कन्यापूजन, मंगळवार दि.३० रोजी महिला भारुडाचा कार्यक्रम व लहान मुलांसाठी स्पर्धा होणार आहेत. बुधवार दि.१आक्टोंबर रोजी बारा वाजता होमहवन व अजाबळी, सायंकाळी पाच वाजता परडी भरणे कार्यक्रम, गुरुवार दि.२आक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सीमोल्लंघन (देवीची पालखी मिरवणूक) सोहळा संपन्न होणार आहे.
नवराञोत्सवा दरम्यान शहरातील दानशुर मान्यवरांच्या वतीने सायंकाळी फराळ व प्रसाद वाटप होणार आहे. तरी सर्व देवी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे अवाहन अंबाबाई मंदिर ट्रस्ट व मंदिर जिर्नोद्धार समितीने केले आहे.