धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ सप्टेबंर रोजी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा -
बंजारा आरक्षण कृती समितीची माहिती
धाराशिव,दि.२१ :
बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी येत्या सोमवार दि.२९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आपल्या हक्काच्या मागणीकरिता बंजारा समाज बांधवांनी या महामोर्चात जास्तीत जास्त संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन
धाराशिव जिल्हा बंजारा एस.टी. आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बंजारा समाजास आरक्षण मिळावे ही मागणी खुप जुनी आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू, समाजाचे नेते मंडळीसह अनेकांनी वेळोवेळी तत्कालीन पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांना आवश्यक ते पुरावे,निवेदन, अर्ज देवुन विनंत्या केली आहे. मात्र शासनाने बंजारा समाजाच्या मागणीकडे डोळेझाक केले आहे . लोकप्रतिनिधीनी समाजाचा मतदानासाठीच उपयोग केल्याचे आरोप केला जात आहे. सध्या राज्यात सर्वत्र आरक्षण मागणीसाठी बंजारा समाज पेटुन उठला असुन आक्रमक झाल्याचे सर्वश्रुत आहे.
आरक्षण मागणी संदर्भात जिल्हास्तरावर मोर्चे बांधणी चालू आहे. त्याकरिता सोमवार दि.२९ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये समाज बांधवासह बंजारा समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटना ,माता भगिनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.