५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरच्या वार्षिक प्रशिक्षणास सुरुवात

मुरुम,दि.२३: डॉ सुधीर पंचगल्ले 

सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर येथे ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरच्या कम्बाईन वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला असून सदर शिबीर २१ ते 30 सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे.
या कॅम्पचे कॅम्प कमांडंट कर्नल संतोष नौगण ,डेप्युटी कॅम्प कमांडंट वाय.बी.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेटना विविध प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण दिले  जाणार आहेत. या वार्षिक प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना कर्नल संतोष नौगण यांनी एनसीसी कॅडेटना एकता व अनुशासन याचे पालन करून राष्ट्र निर्मितीसाठी एनसीसी कॅडेट यांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. या कॅम्पसाठी सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय चे प्रशासक  सचिन जांबुतकर व देवस्थान चे विश्वस्त  यांनी कॅम्पसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त केले. 


या कॅम्प चा मुख्य उद्देश २६ जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एनसीसी कॅडेट्स निवड  केली जाणार आहे .या  एनसीसी  कॅडेट्सना ड्रिल ,फायरिंग,सांस्कृतिक कार्यक्रम, फ्लॅग एरिया, खेळ , बेस्ट कॅडेट  इत्यादी सराव घेतला जाणार आहे .
या कॅम्प दरम्यान कॅडेट्सना  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर विविध खेळाचे आयोजन  केले आहे. या कॅम्पमध्ये लातूर धाराधिव,धुळे अमळनेर,अहिल्यानगर,नांदेड, छत्रपती संभाजीनगर असे एकूण 09 बटालियन च्या शाळा व महाविद्यालयातील  जवळपास ४५० एनसीसी कॅडेट सहभागी झाले आहेत.


या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर,सुभेदार मेजर शंभू सिंग, चिफ ऑफिसर महावीर काळे,लेफ्टनंट के .एम. क्षिरसागर,नमनगे जगदीश ,विलास राऊत ,सुभेदार हरेंदर सिंग, सू. संजय चिकने, सू.देशराज सिंह , सू.उत्तम पाटील,ना.सुभेदार बाजीराव पाटील,बीएचएम शिवशंकर निकम तसेच  कार्यालयीन हेड क्लर्क घोगरे बी .व्ही.व पवार आर आर हे परिश्रम घेत आहेत .
 
Top