अतिवृष्टीने नुकसान झालेल्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी 

धाराशिव,दि.२३:

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत  देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी  यांच्याकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. 22) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडत असून धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण पिके पाण्याने पिवळी पडून जाग्यावर सडली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पिक सततच्या पावसाने वाया गेलेले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकतरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. तरी योग्य ती उपाययोजना करुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यास संबंधीतास आदेशीत करुन जिल्हयातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भिमाशंकर इंगळे यांनी दिला आहे. 

यावेळी अभय साळुंके, शिवाजी चव्हाण, महादेव चव्हाण, सुभाष राठोड, विनायक राठोड, गोविंद चव्हाण, भीमराव राठोड, मोतीराम राठोड, पंडित पाटील आदी उपस्थित होते.
 
Top