धाराशिव येथिल आयोजित बंजारा समाजाच्या मोर्चावेळी वैद्यकीय सेवा पुरविण्याची मागणी 

धाराशिव,दि.२२:

सकल गोर बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ठ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या दि. २९ रोजी धाराशिव येथे अहिल्यादेवी होळकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या निघणा-या मोर्चा दरम्यान वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी धाराशिव 
शासकीय जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक  यांना सोमवारी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

  सकल गोर बंजारा समाजास एस.टी. प्रवर्गात आरक्षण मिळण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर निवेदन देण्यासाठी समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर मोर्चे बांधणी चालू आहे. इतर जिल्हयाप्रमाणे धाराशिव जिल्हयातील बंजारा समाजाच्या वतीने दि. 29/09/2025 रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात बंजारा  बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

सकल गोर बंजारा एस.टी. आरक्षण कृती समितीच्या निवेदनाचा  विचार करुन दोन तज्ञ डॉक्टर, दोन परिचारिका, आपतकालीन परिस्थिती इतर साधनाने सुसज्ज दोन अंबुलन्स (औषधोपचार) सेवा  पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.

 निवेदनावर  सुरेश पवार,विशाल जाधव, ॲड.राज राठोड, कालिदास चव्हाण, बाबाजी राठोड, अविनाश चव्हाण,मोहन राठोड,सचिन राठोड, रोहितदास राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top