नळदुर्ग,दि.२२:
दि.१७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते २ ऑक्टोंबर गांधी जयंती पर्यंत "सेवा पंधरवाडा " साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे यांनी नळदुर्ग येथे भाजप पदाधिकारी , कार्यकर्त्यांच्या आयोजित कार्यशाळेत दिली.
नळदुर्ग शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात नळदूर्ग शहर व ग्रामीण मंडलची सोमवार दि. २२ संप्टेबर रोजी कार्यशाळा संपन्न झाली.कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपचे नेते सुशांत भुमकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम ,आरोग्य शिबिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनावर आधारित कार्य, आत्मनिर्भर भारत , स्वदेशीचा जागर, दिव्यागं व्यक्तीचा सन्मान असे कार्यक्रम साजरे केले जात आहेत.तर कांहीं कार्यक्रम झालेले आहेत. पंडित दीनदयाल उपाध्येय यांची जयंती दि .२५ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. त्यानिमित्त "एक पेड मॉ के नाम" लावण्यात येणार आहे.
नळदुर्ग येथील कार्यशाळेत नळदुर्ग शहर मंडल अध्यक्ष बसवराज धरणे , ग्रामीण मंडल अध्यक्षा रंजनाताई राठोड, राज्य परिषदेचे सदस्य सिद्धेश्वर कोरे, अरविंद पाटील, पद्माकर देवळे , संजय मोटे, उमेश गोरे, दिपक घोडके, विनायक अहंकारी, जिलानी कुरेशी, नाना काजी, गौस शेख, सिकंदर काजी, श्रमिक पोतदार ,धिमाजी घुगे,पद्माकर घोडके, एस के बागवान, रियासत शेख, अवेज सय्यद, सलीम बागवान, अभिजीत लाटे, अक्षय भोई ,बबन चौधरी, संदीप गायकवाड, सुदर्शन पुराणिक, कैलास चव्हाण, रियाज शेख, शरद देशमुख , मुदस्सर शेख आदी उपस्थित होते.