विभाग स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत नळदुर्ग महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी
विभाग स्तरीय शालेय तायक्वांदो क्रिडा स्पर्धेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लातूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे दि. २४ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या १९ वर्ष वयोगटातील या स्पर्धेत महाविद्यालयातील मल्लिकार्जुन कोने या विद्यार्थ्याने ( ४८ कि.ग्रॅ. ) वजन गटात सुवर्ण पदक पटकावले आहे तर ऋतुराज मोरे या विद्यार्थ्याने (७३ कि. ग्रॅ. ) वजन गटात सुवर्ण पदक मिळविले आहे. विभागीय स्पर्धेत या दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक मिळविल्याबद्दल मल्लिकार्जुन कोने व ऋतुराज मोरे यांची राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक डॉ. कपिल सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण ,सचिव उल्हास बोरगांवकर ,कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे , बाबुराव चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सहसचिव प्रकाशराव चौगुले, शाहबाज काझी , अँड. प्रदीपराव मंटगे , लिंबराज कोरेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.