नळदुर्ग महाविद्यालयाचा संघ खो-खो स्पर्धेत 
प्रथम क्रमांक पटकावले

नळदुर्ग,दि.२४: डॉ. दिपक जगदाळे 

 शालेय तालुका स्तरीय १९ वर्ष वयोगटातील मुलांमुलींच्या खो-खो स्पर्धे मध्ये नळदुर्ग येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मुलामुलींच्या संघानी प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक जळकोट येथील राजश्री शाहू कला , विज्ञान विद्यालयाने मिळविला. 

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेसाठी एकूण सहा संघांनी नोंदणी केली होती परंतु प्रत्यक्षात या स्पर्धेसाठी फक्त तीनच संघानी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांच्या हस्ते नांदेड येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत निवड झालेल्या कु.प्रिया जाधवर हिचा सत्कार देखील करण्यात आला. 

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, डॉ. अशोक कदम , डॉ. उद्धव भाले, तुळजापूर येथील जेष्ट क्रिडा मार्गदर्शक इसाक पटेल,क्रिडा शिक्षक डॉ. कपिल सोनटक्के प्रा. पांडुरंग पोळे , लिपिक विनायक राठोड उपस्थित होते. सदरिल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश गायकवाड, यल्लापा गायकवाड, सिद्धू सुतार यांनी परिश्रम घेतले.
 
Top