राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा   

 मुरूम,दि.२५: 

येथील कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (ता. २४) रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोविंद इंगोले होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. किसन माने म्हणाले की, स्वयंसेवकांनी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी परिसर स्वच्छता, प्रौढ शिक्षणासाठी जनजागृती, मतदान जनजागृती, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमामध्ये स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला पाहिजे. प्राचार्य इंगोले म्हणाले की,  विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्य करण्यास प्रोत्साहित करणे, हे राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्टे असल्याचे  व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी गजानन उपासे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रसाद इंगोले, सुजित चिकुंद्रे उपस्थित होते, सूत्रसंचालन व आभार प्रा. शेषेराव राठोड यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.                    
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गोविंद इंगोले बोलताना किसन माने, गजानन उपासे  व अन्य.
 
Top