नळदुर्ग नगरपालिका निवडणूकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त सुचना व हरकतीबाबत सुनावणी येत्या गुरुवारी होणार जिल्हाधिकारी कार्यालयात
नळदुर्ग, दि.०२
नळदुर्ग येथील नगरपालिका निवडणूकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त सुचना व हरकतीची सुनावणी दि.४ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.
नळदुर्ग नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचना प्रारूप आराखडा १८ ऑगस्ट रोजी जाहिर केले असून त्याबाबत राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, नागरिक व इच्छुकांकडून ३१ ऑगस्ट पर्यंत लेखी हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार चौघांच्या हरकती प्राप्त झाल्या.त्यावरुन नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी बसवराज धरणे, ज्ञानेश्वर नारायण घोडके यांना मंगळवार दि.०२ सप्टेंबर रोजी लेखी नोटीसव्दारे सुनावणीबाबत कळविले आहे.
नगर विकास यांच्या संदर्भीय आदेशान्वये नगरपरिषद नळदुर्ग सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनावर दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी पुनर्वसन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या दालनात सुनावणी आयोजित केली आहे. या सुनावणीस हरकत घेतलेल्यानी किंवा विधीज्ञा मार्फत सनावणी करिता उपस्थित राहण्याचे नोटीसद्वारे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी कळविले आहे.