मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील  यांच्यासह संपूर्ण मराठा समाज्याच्या आरक्षण लढ्यास यश आल्याने नळदुर्ग शहरात स्वागत

नळदुर्ग,दि.०२:

मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील  यांच्यासह संपूर्ण मराठा समाज्याच्या आरक्षण लढ्यास यश आल्याची वार्ता समजताच नळदुर्ग शहरात या निर्णयाचे स्वागत करुन पेढे भरवुन जल्लोष करण्यात आला.
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनास आज मंगळवार दि.०२ सप्टेंबर अखेर यश आले. मनोज जरंगे पाटील गत २९ ऑगस्ट पासून मुंबई येथे उपोषणास बसलेले होते. त्यास प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. अख्खी मुबंई मराठा आरक्षण समर्थकांनी भरून गेली होती. आज त्यास यश मिळाले राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आझाद मैदान येथे येऊन जरंगे पाटील यांची भेट घेतली व जरंगे यांच्या सर्व मागण्या  मान्य केल्या.

 त्यामुळे मराठा समाजासह नळदुर्ग शहरातील सर्व नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करून  आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपचे नेते सुशांत  भूमकर, माजी नगरसेवक संजय बताले,  संजय मोरे , मोहन बाबरे, संजय जाधव, बलदेव ठाकूर ,समीर मोरे ,पप्पू पाटील,  दुबे दादा ,बिटू मुळे , भिमाशंकर बताले, महादेव हत्ते, खय्युम  शेख, नविद शेख ,अम्मुलाल शेख आदी उपस्थित होते.
 
Top