नवशक्ती गणेश मंडळाच्या रक्तदान शिबराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरूम,दि.०२:
मुरूम शहरातील मानाचा व नवसाचा अशी ओळख असलेल्या सुभाष चौकातील नवशक्ती गणेश मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
शहरातील सुभाष चौक येथील नवशक्ती गणेश मंडळ नेहमी अनेक सामाजिक देखावा आणि उपक्रम गेल्या 40 वर्षांपासून राबवत आहे. यंदाच्या महोत्सव निमित्ताने शिक्षण व आरोग्य यावर भर देऊन मंगळवारी रक्तदान शिबिरराचे आयोजन केल्यावर या शिबिरात शहरातील अनेक रक्तदाते सहभागी झाले व एकूण 52 रक्तदाते योगदान दिले आहेत.
अशा सामाजिक कार्यासाठी नवशक्ती गणेश मंडळाचे मर्गदर्शक अर्जुन खंडागळे,ज्ञानेश्वर चौधरी,अशोक जाधव, अजित चौधरी, महेश निंबरगे,दादा बेंडकाळे, नेताजी बेंडकाळे, बसवराज कलशेट्टी, संजय आळंगे, विशाल मोहिते, सिंहराज खंडागळे तसेच यंदाचे अध्यक्ष प्रशांत चौधरी, उपाध्यक्ष हरी बेंडकाळे , महेश खंडागळे, सागर बिराजदार, दत्ता चौधरी, ओंकार चौधरी, सागर चौधरी, सुनील दीक्षित, विठ्ठल चौधरी राघवेंद्र चौधरी, प्रवीण बिराजदार,युराज मडोळे, शरण मडोळे, राजेश माने, महेश हिंडोळे, लखन सत्रे, नेताजी गायकवाड, गणेश इंगळे, अनिल बिराजदार, प्रतीक चव्हाण,आकाश आळंगे, शहाजी चौधरी, सुभाष आळंगे,सुमित पांढरे, अभिजित खंडागळे, साईनाथ मडोळे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्तेनी पुढाकार घेतले.