महाराष्ट्र सेट परीक्षेत बालाघाट महाविद्यालयाचे यश ; यशस्वी चौघा विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात गौरव
नळदुर्ग,दि.०२ :
महाराष्ट्र सेट परीक्षेत नळदुर्ग शहरातील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यानी यश संपादन केल्याने महाविद्यालयाच्या विकासात मानाचा तुरा रोवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे,
सचिव उल्हास बोरगांवकर, संचालक बाबुराव चव्हाण, प्राचार्य सुभाष राठोड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दि.०२ सप्टेंबर रोजी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
साविञीबाई फुले विद्यापीठाकडून जुन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेत यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने गौरव करुन शुभेच्छा देण्यात आले. प्राचार्य डॉ.सुभाष राठोड यांच्या हस्ते करण्यात सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ अशोक कदम, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, प्रा.रोहिणी महिद्रकर, प्रा . डॉ.एच एम मिर्झा, डॉ डी एल भोवाळ, डॉ विजय सावंत, , डॉ डी जी जाधव, डॉ निलेश शेरे, डॉ दिपक जगदाळे, डॉ पी एस गायकवाड, डॉ महेंद्र भालेराव, डॉ अतिष तिडके, डॉ यु.एन भाले, डॉ हंसराज जाधव , डॉ समीर पाटील, डॉ बी एस. सावते, डॉ युवराज पाटील, डॉ .बी एन वाघमारे , डॉ राठोड जी टी आदीसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.