अतिवृष्टी पिक नुकसानीचे सरसकट प्रती हेक्टरी एक लाखाची शेतकऱ्यांना मदत करण्याची पालकमंत्री याच्याकडे शेतकरी संघर्ष समितीची मागणी
नळदुर्ग, दि.२५:
धाराशिव जिल्हात मागच्या काही दिवसापासून होत आसलेल्या आतीवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता तोडाशी आलेले घास निसर्गाने हिरावले. अतिवृष्टीत पिक नुकसानीचे सरसकट प्रती हेक्टरी एक लाखाची शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी पालकमंत्री याच्याकडे शेतकरी संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
पिकासह जमिन खरडुन गेली आहे. शेतकऱ्यांचे जनावरे मृत्यूमुखी पडलेले आहेत. घरामधी पाणी शिरून नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हावालदील झालेला आसुन शेतकऱ्यांला सध्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई म्हणून सरसकट एक लाख रूपये प्रती हेक्टरी आर्थिक मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी, महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत दिलेल्या आश्वासन प्रमाणे संपुर्ण कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव याना दिलेल्या निवेदिता केली आहे.
निवेदन मंडल अधिकारी नळदुर्ग काबळे यांना अप्पर तहसील नळदुर्ग येथे देण्यात आले. यावेळी दिलीप जोशी, सरदारसिग ठाकुर, व्यकट पाटील, महादेव बिराजदार, महेश घोडके, दिलीप पाटील, गुलाब शिदे, काशिनाथ काळे, आशोक पाडोळे, तोलु शेख, बंडु मोरे, बालाजी ठाकुर, प्रताप ठाकुर, पिरपाशा ईनामदार, संतोष फडतरे, कालीदास जाधव, आरुण काळे ईत्यादी शेतकरी नळदुर्ग, वागदरी, गुजनुर, शाहापुर गावचे शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.