पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त नळदुर्ग भाजप कार्यालयात आभिवादन
नळदुर्ग,दि.२५ :
थोर विचारवंत, जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आभिवादन करण्यात आले.
गुरुवार दि.२५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हास्ते करण्यात आले.त्यानंतर दिवंगत माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांना आदरांजली वाहिली.
यावेळी भाजपचे नेते सुशांत भुमकर, नळदुर्ग शहर मंडल अध्यक्ष बसवराज धरणे, ग्रामीण मंडल अध्यक्षा रंजनाताई राठोड, जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, अँड दीपक आलुरे, राज्य परिषद सदस्य सिद्धेश्वर कोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता राजमाने ,तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, किशोर बनसोडे, दामाजी राठोड, सिकंदर काजी,अक्षय भोई,अनिल ऊर्फ पप्पू पाटील, बंडू कसेकर ,संजय जाधव ,संजय मोटे आदी उपस्थित होते.