माऊली तरुण मंडळ आयोजित महा होम मिनिस्टर  सिने अभिनेता सचिन सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न; महिला भगिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

तुळजापूर,दि.०६: श्रीकांत कदम

माऊली तरुण मंडळ माऊलीनगर आयोजित महा होम मिनिस्टर २०२५ सिने अभिनेता सचिन सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला . या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी फ्रिज, टीव्ही, वाशिंग मशीन, इलेक्ट्रिक शेगडी, सोन्याची नथ यासह ७० पेक्षा जास्त बक्षिसे लकी ड्रॉ च्या माध्यमातून देण्यात आली. या लकी ड्रॉ मधे सोन्याची नथ, पैठणी १०,मिक्सर २,कुकर २०,इस्त्री २०,पोळी डबा २०,यासह अनेक बक्षिसे देण्यात आली.

प्रथम क्रमांकाचे बक्षीस फ्रीज-सौ भक्ती राहुल सपकाळ,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस वाशिंग मशीन-सौ पायल किशोर कसबे, तृतीय बक्षीस टीवी-सौ अंबिका चंद्रकांत रेणके, चतुर्थ बक्षीस पैठणी-सौ शोभा सोमनाथ केवटे ,पाचवे बक्षीस नथ-सौ सुवर्णा कदम यांना मिळाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रियाताई विजय गंगणे, माजी नगराध्यक्षा भारतीताई नारायण गवळी आणि रोहिणीताई रामचंद्र रोचकरी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमात ६०० पेक्षा जास्त महिलांचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन सूरज नन्नू दादा साठे व माऊली तरुण मंडळ यांनी केले. .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम साठे,लखन कदम, दिग्विजय सूर्यवंशी,सूरज पारवे, मयूर नन्नवरे,निखिल देशमुख,बालाजी सरडे,विराज लबडे,स्वराज पवार,समीर शिंदे,रमण शिंदे,गणेश लोमटे, सुमित नाईकवाडी,बंटी भोरे,आकाश सरडे, रोहित भोरे,सतीश राऊत,दयानंद कांबळे,अशोक लबडे , पारवे,प्रतीक शिंदे,अमर शिंदे, ओंकार लबडे ,आलम जमादार,शिवराम चव्हान,भवन शिंदे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमानंतर प्रत्येकास एक रोपटे भेट देण्यात आले.
 
Top