घोळसगाव गावचा चारीही बाजूचा संपर्क तुटल्याने गावकरी अडचणीत; वाहन जात येत नसल्याने रुग्णांचे बेहाल , तातडीने पूल करून मार्ग सुरळीत करण्याची मागणी
अक्कलकोट दि. २९:
तालुक्यातील मराठवाडा बॉण्ड्री लागत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे गाव म्हणून ओळख असलेले घोळसगाव या गावचा गेल्या 15 दिवसापासून चारही बाजूनी संपर्क तुटल्याने गावाकऱ्यांचे तोबाहाल पाहायला मिळत असून, गावातील आजारी रुग्णांना, डिलेव्हरी रुग्ण यांना दवाखान्याला कसे व कुठून घेऊन जायचे हा यक्ष प्रश्न गावाकऱ्यासमोर उभा आहे. गावातील जीवनाआवश्यक वस्तूचा देखील तुटवडा जाणवत आहे.
या सर्व गंभीर बाबीकडे प्रशासनाच्या नाकर्ते पाणामुळे घोळसगावकराना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकऱ्यांना सांगून देखील त्यांनी बोरगाव ते घोळसगाव, घोळसगाव ते किरणळी, घोळसगाव ते किणी, घोळसगाव ते सिंदगाव या चारही रस्त्याचे काम जाणूनबुजून करत नसून, आम्ही जगायचं कसं अशी आर्त हाक घोळसगाव च्या ग्रामस्थांमधून पाहवयास मिळत आहे. जर चारही बाजूचे रस्ते तात्काळ दुरुस्त न केल्यास रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे घोळसगाव चे सरपंच राजशेखर किवडे यांनी सांगितले.
घोळसगाव चा चारही बाजूनं संपर्क तुटला असून, माझ्या गावाकऱ्यांची सर्व बाजूनी हाल होत आहेत. आजारी रुग्णांना रुग्णालय पर्यंत घेऊन जायचे कसे..? हा प्रश्न पडलाय. एकदा पेशन्ट जरी दगावला तर याला सरस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन जबाबदार आहे. जर तात्काळ रस्ते दुरुस्त न केल्यास अमरण उपोषण करणार आहे.
राजशेखर किवडे, सरपंच, घोळसगाव