डॉ. रामलिंग पुराणे यांना नवी दिल्ली येथे क्रिएटिव्ह भारत अवॉर्डने गौरव
मुरूम दि.. २९ : डॉ सुधीर पंचगल्ले
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग काशिनाथ पुराणे यांना नवी दिल्ली येथील नमस्ते क्रिएटिव्ह भारतच्या माध्यमातून मॅगझीनमध्ये डॉ. पुराणे यांचे सामाजिक कार्याचे पॉवर प्रोफाइलची निवड झाली आहे.
रविवार दि. २८ रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना क्रिएटिव्ह भारत अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी दक्षिण दिल्ली खासदार रमेश बिधुरी, डायरेक्टर टेकनॉलॉजि अँड इनोव्हाशन्स प्रा. डॉ. आर. के. खंडाल, कमांडर, इंडियन नेव्ही वेत्रण व्ही. के. जेटली, पूर्व लोकसभा टीव्ही सी ई ओ सीमा गुप्ता,कथक डान्सर डॉ. अनु शर्मा, इंटरनॅशनल किक बॉक्सर सुधीर सक्सेना, आयोजक जितेंद्र तिवारी, राजेश तिवारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नमस्ते क्रिएटिव्ह भारत या चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे राष्ट्रहितासाठीचे प्रेरणादायी कार्याचे पॉअर प्रोफाइल नमस्ते क्रिएटिव्ह भारत या मॅगझीन मध्ये प्रकाशित करण्यात आले .यावेळी महाराष्ट्रातून उपस्थित डॉ. पुराणे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कु. रुद्राक्षी रामलिंग पुराणे सह देशभरातील नागरिक उपस्थित होती.