राष्ट्रवादीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी येडशी चौरस्त्यावर  रास्तारोको ; ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजाराच्या मदतीसह शेतकरी कर्ज माफी करण्याची मागणी

धाराशिव ,दि.२६:

    धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी रुपये ५० हजाराची मदत करावी. तसेच शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी करण्यात यावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली येडशी (ता. धाराशिव) चौरस्त्यावर शुक्रवारी (दि.२६)सकाळी ११ वाजता जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

या रास्तारोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात मंत्र्याच्या गाड्या आडविण्यात येतील, असा इशारा श्री. दुधगावकर यांनी दिला आहे.
       
यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, माहे १ जून २०२५ ते २४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यामध्ये सरारीने ४२ मंडळामध्ये १००० ते ११०० मी.मी.पाऊस पडला. त्यापूर्वी १४ मे २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत १७३ मी.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यामध्ये खरीप २०२५ ला ५ लाख ७२ हजार इतक्या शेतीवर सोयाबीन, मुग, उडीद, मका, फळबागा, ऊस उत्पादक आदीची लागवड झाली. परंतू ही पीके १०० टक्के अतिवृष्टीमुळे उद्धवस्थ झाली. जिल्ह्यातील सर्व मंडळामध्ये शासनाने सरसकट पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करुन ५० हजाराची तातडीने मदत करावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. शेतीमालाला, भाजीपाला व फळांना हमीभाव कायदा करुन भावांतर योजना लागू करावी. दुधाला हमीभाव कायदा लागु करुन गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ७० रुपये भाव देण्यात यावा. प्रधानमंत्री पीक विमा योजना या हंगामापासून रद्द केलेले (१) पेरणी न होण्याची परिस्थिती (२) प्रतिकुल हवामान (३) स्थानिक अपदा (४) पिक कापनी पश्चात अपदा या तरतुदी पीक विमा योजनेसाठी पूर्वीप्रमाणेच समाविष्ट कराव्यात. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली व गाळ साठला आहे, अशा बहुभुधारक शेतकऱ्यांना देखील शासकीय योजनेमध्ये सामावेश करावा.अतिवृष्टी व पुरामुळे घरांची, शेतकऱ्यांची, मजुरांची व जनावराचे गोठे उद्धवस्थ झालेले आहेत, त्यांना आर्थीक मदत द्यावी, ज्या शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे पशुधन वाहुन गेले आहे, अशांना पशुधनाची भरपाई चालु बाजार भावाप्रमाणे द्यावी. अतिवृष्टीमुळे तलाव, बंधारे, ओढे रस्ते, पूल वाहुन गेलेले आहेत त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी. शासनाने घोषीत केलेली ३१ आॅगस्ट २०२५ पर्यंत धाराशिव जिल्ह्याला घोषीत केलेली १७९ कोटी रुपयाची मदत अत्यंत तुटपूंजी स्वरुपाची आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे राज्य सरकारने धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असताना ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागातील जनतेच्या वतीने मायबाप सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

   या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, भारत शिंदे, बालाजी डोंगे, नामदेव चव्हाण, इकबाल पटेल, किशोर आवाड, गौतम क्षिरसागर, बबन काळदाते, प्रदिप काळदाते, अ‍ॅड. प्रविण शिंदे, अ‍ॅड. प्रमोद शिंदे, आप्पासाहेब आवाड, किशोर आवाड, बाळासाहेब निगुट, गणपत भोसले, बाळासाहेब कथले, विठ्ठल माने, औदुंबर धोंगडे, मनोहर हरकर, लिंबराज लोकरे, शिवाजी ढोले, गुंडाप्पा गाजरे, संभाजी गायकवाड, हनुमंत गरड, भास्कर शिंदे, पांडूरंग भराटे, महमंद शेख, भगवान बायस, किसन शिंदे, दिनेश खुने, शंकर कांबळे, सतीश माने, चंद्रकांत पाटील, राजाभाउ शेळके, शशिकांत पाटील, संदीप जाधव, उध्दव शेळके, बापू शेळके, अमित पाटील, कुलदिप घावटे, शाहु पवार-नाईक, प्रशांत मेटे, गणेश धाबेकर, गणेश गडकर, बाळासाहेब कणसे, बाळासाहेब माने, पंडीत घाडगे, मदर शेरीकर, रफिक शेख, सरदार पटेल, दत्तात्रय वाघमारे, दिनकर गायकवाड, राजेंद्र शिंदे, उमेश रितापुरे, अनिल जाधव, राहुल धाबेकर, अक्षय धाबेकर आदींची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती. 

 
Top