नळदुर्ग: न.प. कार्यालयात प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अर्थात पीएम स्वनिधी ; पथविक्रेत्यांसाठी आत्मनिर्भरतेची संधी
नळदुर्ग,दि.२६:
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत नळदुर्ग शहरातील सर्व स्थिर /फिरते आणि तात्पुरते फेरीवाले यांच्यासाठी सदर योजना चालू झाली असून शहरातील जनतेने या योजनेचा खालीलप्रमाणे लाभ घ्यावा असे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी आवाहन केले आहे.
पहिलले कर्ज रुपये १५ हजार, दुसरे कर्ज रुपये २५ हजार, तिसरे कर्ज ५० हजार रुपयांचे खेळते भांडवल राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर व्याजावर ७ टक्के अनुदान, डिजिटल व्यवहारावर कॅशबॅक, विनातारण कर्ज सुविधा आहे. याकरिता लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक मोबाइल नंबर,बाजार फी वसुली पावती, फोन पे/गुगल पे/यूपीआय आयडी ईत्यादी.
लाभार्थ्यांनी नळदुर्ग नगरपरिषद कार्यालयात शहर अभियान व्यवस्थापन कक्ष सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री सुरज गायकवाड (DAY - NULM / DJAY-S ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन न.प.प्रशासनाने केली आहे.
नळदुर्ग नगरपरिषदे मार्फत लोक कल्याण मेळावाचे आयोजन
केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत लोकल्याण मेळावाचे आयोजन मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांचे अध्यक्षतेखाली नळदुर्ग नगरपरिषदेत करण्यात आले.
दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर या कालावधीत चालणा-या लोककल्याण मेळावाच्या दरम्यान पथविक्रेत्यांना प्रथम टप्प्याचे १५ हजार रूपये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे कर्ज एक वर्ष मुदतीत परतफेड केल्यानंतर व्दितीय टप्प्यासाठी २५ हजार रूपये आणि ५० हजार रुपये असे या योजनेमधून तीन टप्प्यांमध्ये पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेतू कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्रशासनाची पीएम स्वनिधी ही एक महत्तवकांक्षी योजना मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ बाबत सर्वांना अवगत करण्यात आले. तसेच शहरातील सर्व बँकांनी पथविक्रेंत्याचे कर्ज तात्काळ मंजूर करून कर्ज वितरीत करावे, सर्व लाभार्थ्यांचे प्रलंबित कर्ज प्रस्ताव लवकर निकाली काढावे, अशा बँकांना सूचना देण्यात आल्याआहेत.