स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबीरात नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात ३७२ रुग्णांची तपासणी
नळदुर्ग,दि.२७ :
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य शिबीरामध्ये नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात ३७२ रुग्णांची तपासणी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली.या शिबीरास रुणांचा प्रतिसाद मिळाला.
शासनाच्या आरोग्य विभागाकडून स्वस्थ नारी- सशक्त परिवार हे अभियान दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत असून या अंतर्गत नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात गुरुवार दि.२५ संप्टेबर रोजी एकदिवसीय शिबिर घेण्यात आले.
यामध्ये नाक,कान,घसा, कॅन्सर विषयी तपासणी, गरोदर मातांची तपासणी असे एकूण ३७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच आयुष्यमान कार्ड नोंदणी यासह किशोरवयीन मुली यांची सर्व तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. चंचल बोडके यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीस दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी अधिक्षक डॉ.चंचल बोडके,डॉ सुरेंद्र मडके, डॉ विशाल बिराजदार, डॉ दिपक चव्हाण, डॉ प्रांजली कांबळे, डॉ तबस्सुम तांबोळी,डॉ सुहास शिंदे, डॉ लक्ष्मीकांत माने, डॉ राहुल जेडगे, डॉ अविनाश भोरे,डॉ मंजिरी शिंगारे,डॉ प्रीती कुलकर्णी,डॉ जगन्नाथ कुलकर्णी, डॉ योगेश्वरी गुट्टे यांनी रुग्ण तपासणी केली.
शिबिरादरम्यान नेत्रचिकित्सक आनंद काटकर
प्रयोगशाळा साहाय्यक शितल चिलोबा, इन्चार्ज मनिषा होगले, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी
उमाकांत डिग्गे, संतोष कांबळे, सुमन फुले , निर्मला तोडकरी, संतोष कांबळे , कु. छकुली राठोड, रामराजे राक्षे, किरण अधिकारी आशिष शेलार,पुजा केसकर,आरती खडतरे यांच्यासह सर्व कर्मचारी, परिचारिका यांनी परिश्रम घेतले. औषध निर्माण अधिकारी नरसिंह जोशी यांनी सूत्रसंचालन तर सहाय्यक अधीक्षक अविनाश धरणे यांनी आभार मानले.