उमरगा (चि.) जि.प. शाळेत "सायबर शिक्षा पर सायबर सुरक्षा" हा उपक्रम संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरगा (चि.) ता . तुळजापूर येथे "सायबर शिक्षा पर सायबर सुरक्षा" हा उपक्रम राबविला.
तुळजापूर तालुक्यातील अणदुर जवाहर उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रतिक मातोळे व फिरोज शेख हे दोन विद्यार्थी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे संगणकशास्त्र संकुलात बीसीए सेकंड ईयरला शिकत असून 'सायबर सिक्युरिटी' याबद्दल विनामूल्य अशी माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरगा (चि.) येथे "सायबर शिक्षा पर सायबर सुरक्षा" हा उपक्रम मुख्याध्यापक शिवराज स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला.
म्हाळाप्पा कोरे, अतुल पोद्दार शिक्षक उपस्थित होते. या सेमिनरमध्ये आजच्या युगामध्ये होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकी पासून कसे सावध राहायचे. OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबर वरून आलेल्या फोन कॉलची तपासणी करावी, या विषयावर सेमिनार घेतला.