मराठवाडा भूषण पुरस्काराने पत्रकार मोहन जाधव यांचा गौरव       

 मुरूम,दि.२७: डॉ सुधीर पंचगल्ले 

पुणे येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने थोर साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. भाऊसाहेब जाधव, अभिमन्यू पवार व प्रकाश इंगोले यांच्या विशेष उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, हार घालून मान्यवरांच्या हस्ते  शुक्रवारी (ता.२५) रोजी मुरूमचे सुपुत्र तथा पत्रकार मोहन जाधव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार- २०२५ ने गौरविण्यात आले. 

पुरस्कारानंतर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना मोहन जाधव म्हणाले की, हा पुरस्कार माझ्या नावाने जरी घोषित झाला असला, तरी तो खराखुरा माझ्या गावकऱ्यांचा शेतकरी-कामगार मायबाप जनतेचा आहे. पत्रकारितेला केवळ दोन वर्षां पूर्ण होत आहेत, पण या अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या व्यथा, सर्वसामान्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणे, हेच ध्येय समोर ठेवले. दरम्यान अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाची नोंद प्रशासनाकडे पोहोचवण्यासाठी सलग पंधरा दिवस केलेली धडपड आजही मनात जिवंत आहे. हा पुरस्कार म्हणजे त्याच जनआवाजाचा गौरव आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात मला प्रेरणा देणारे . पत्रकार चंद्रसेन देशमुख,  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा  प्रा. डॉ. महेश मोटे , पत्रकार रफिक पटेल यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. याशिवाय सामाजिक चळवळीच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, जिवलग सहकारी सीपीआय चे नेते कॉम्रेड आकाश शिंदे, छोटे बंधु एआयएसएफ चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड लखन भोंडवे यांच्या सहवासाने सत्य, स्पष्ट व निर्भीड पत्रकारिता करण्याची प्रेरणा मिळत राहिली. 

                      
 फोटो ओळ  : मुरूम, ता. उमरगा येथील मोहन जाधव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान करताना डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. भाऊसाहेब जाधव, अभिमन्यू पवार व अन्य.
 
Top