दिल्ली येथे स्वतंत्र " मुक्ती दिवस" साजरा, तुळजापूर तालुक्याचा सहभाग

धाराशिव दि.०८:

दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस भवन येथे स्वतंत्र " मुक्ती दिवस" साजरा करण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ३१ ऑगस्त  १९५२ ला विमुक्त जाती जमातीच्या लोकांना स्वतंत्रता मुक्ती दिली.तो दिवस मुक्ती दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो.या अनुषंगाने दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस भवन येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.सी.विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य,गुरुदिपसिंग सप्पल, महाराष्ट्र विधानपरिषदेचे प्रतोद आमदार राजेश राठोड, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा हरियाणा प्रभारी जितेंद्र बगेल, माजी आमदार श्रीमती जलजा नायक, राष्ट्रीय प्रवक्ता आकाश जाधव , राष्ट्रीय काॅडिनेटर सुरेश माहला, सुरजसिंग मंगा डीनटी अध्यक्ष पंजाब,रामजेठा नेतला डीनटी राजस्थान अध्यक्ष, शिवानंद एल  पांचगि कर्नाटक डीनटी अध्यक्ष,रिसाल्ट टबरेज दिल्ली डीनटी अध्यक्ष, आमदार रामकरण काला, राष्ट्रीय समन्वयक तथा आयोजक एस.पी.सिंह लबाना होते .
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, सुरेश पवार, सुभाष तवर, डॉ तुकाराम पवार, राजेश चव्हाण, तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथील माजी सरपंच ज्योतिका चव्हाण, कांताबाई पवार,विनायक चव्हाण, शिवाजी चव्हाण यांच्या सह सर्व राज्यातून बंजारा प्रतिनिधी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top