शक्ती प्रदर्शन करणा-या बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री  सरनाईक यांनी उपस्थित जनसमुदायसमोर स्विकारले 

तुळजापूर,दि.१७:

बंजारा  समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गातील समावेशाच्या मागणीचे निवेदन धाराशिवचे पालकमंत्री ना.प्रताप सरनाईक यांना मंगळवारी तुळजापूर येथे हजोरोच्या संख्येने एकत्रित येत धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव,महिला भगिनीनी दिले.

एकच गोर लाखे रो जोर , जय सेवालाल महाराज, बंजारा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत बंजारा समाज बांधव पहिल्यादाच आरक्षण विषयावरुन आक्रमक झाल्याचे दिसुन आले.तुळजापूर येथिल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमलेल्या समाज बांधवांपर्यत येवुन पालकमंत्री सरनाईक यांनी निवेदन स्विकारले. यावेळी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानी एस.टी. आरक्षणाची मागणी अनेक दशकांपासूनची जुनी मागणी असुन यापुर्वीही वेळोवळी शासनाकडे पाठपुरावा पुरावा करुनही आमच्या हक्कापासुन वंचित ठेवल्याचे सांगुन राज्यभर बंजारा समाज याविषयी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी निवृत्त अन्नसुरक्षा अधिकारी शंकर राठोड, रवि महाराज राठोड, संजय महाराज राठोड, माजी जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड , माजी नगरसेविका छमाबाई राठोड, माजी नगरसेवक निरंजन राठोड, तांडा सुधार समितीचे अशासकीय सदस्य प्रवीण पवार, संतोष चव्हाण, विद्यानंद राठोड, वसंत पवार, दामाजी राठोड, निवृत्त नायब तहसिलदार माणिक चव्हाण, हरीश जाधव,अँड राज राठोड, एल.टी. चव्हाण, शशिकांत राठोड, शशिकांत चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, लक्ष्मण राठोड, सुरज चव्हाण, मोतीराम थावरु चव्हाण, सूर्यकांत राठोड ,दत्ता राठोड, सुरेश राठोड, शिवाजी राठोड, राजू चव्हाण, विनायक राठोड, संजय राठोड, गुलाब जाधव, आदिसह विविध गावचे सरपंच, उपसंरपच, ग्रामपंचायत सदस्य, बंजारा समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवरासह धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव, महिला उपस्थित होत्या.
 
Top