बंजारा  समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गातील समावेशाच्या मागणीबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मुख्यमंत्री यांना पत्र

तुळजापूर, दि.१७:

 मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाचा हैद्राबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील समावेशाच्या मागणीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्र दिले आहे.


आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की,  बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्यावे, या मागणीसाठी धराशिव जिल्हा बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने दि. १४/०९/२०२५ रोजी भेट घेऊन आपली मागणी व्यक्त केली. हैद्राबाद गॅझेटियरमधील 'द लमाडास', ज्यांना 'बंजारा' किंवा 'सुगाळी' असेही म्हणतात, हा एक भटक्या जमातीचा गट आहे. जो हैदराबाद संस्थानात, विशेषतः बेरार आणि मराठवाडा प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने आढळतो. त्यांचा उल्लेख स्वतंत्र हिंदू जमात म्हणून करण्यात आला असून अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याच गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आल्याचे नमूद केले. या अनुषंगाने मुंबईमध्ये बंजारा समाज बांधव व वरिष्ठ विविज्ञ यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे.

तरी, बंजारा समाजासाठी हैद्राबाद गॅझेटियर लागू करणे न्यायिक राहील, या मागणीसाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे.

 
Top