प.पु.श्री लिंगय्यादेवरू महाराजांचा मुरूमवासियांच्या वतीने  सत्कार

मुरूम,दि.१६: 

अक्कलकोट तालुक्यातील सलगर(कारुणी) येथील श्री शिवबसवेश्वर विरक्त मठाचे नूतन उत्तराधिकारी  प.पु श्री लिंगय्या देवरू यांचा मुरूम येथील धर्मगुरू हरगुरु चरमूर्ती शिवाचार्य शिवयोगी महाराज यांच्यावतीने सत्कार करून स्वागत करण्यात आला.

मंगळवारी येथील चरमूर्ती विरक्त मठात प.पु.श्री लिंगय्या देवरू महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सत्कार सोहळा पार पडला.श्रावण महिन्यात येथील चरमूर्ती मठाचे मठाधिपती श्री शिवाचार्य शिवयोगी महाराज यांनी सलगर (कारुणी) येथील श्री शिवबसवेश्वर विरक्त मठ यांच्या वतीने श्री सुक्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान येथे  आयोजित केलेल्या  लोक कल्याणार्थ मौन अनुष्ठान धार्मिक कार्यात  ४१ दिवस अनुष्ठानास बसले होते.अनुष्ठान समाप्ती नंतर चरमूर्ती शिवाचार्य शिवयोगी महाराज मुरूम येथे परत आल्यानंतर सलगर मठाचे नूतन उत्तराधिकारी प.पु.लिंगय्या देवरू महाराज यांनी मुरूमच्या विरक्त मठाला मंगळवारी सदिच्छा भेट दिली. 

यावेळी मुरूमवासीयांनी त्यांचा  सत्कार करण्यात केले .याप्रसंगी जगदीश निंबरगे,बालाजी टिकांबरे,निलप्पा भोसगे,चंद्रकांत काळे,गुरय्या स्वामी तसेच सातलींग गुंडरगी,मल्लिनाथ भोसगे,रमेश बिराजदार,चंद्रकांत तुकमळे, श्रीशैल चिकमोळ, बसवराज फुलारी,पंडित इकलगी, सिद्राम फुलारी,शेखर बिराजदार, रमेश बिराजदार आदीजण उपस्थित होते
 
Top