आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समवेत बंजारा आरक्षणबाबत शिष्ट मंडळाबरोबर सकारात्मक चर्चा 

धाराशिव, दि.१६ :  

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे रविवार दि.१४ सप्टेंबर रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेतली असता सकारात्मक चर्चा  झाली.

 यावेळी झालेल्या बैठकीत बंजारा समाज बांधवांनी हैदराबाद गॅजेट्सच्या नोंदीनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी केली. 

या मागणीसाठी उमरगा तालुक्यातील नाईकनगर येथील पवन चव्हाण यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. त्यामुळे समाजाच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाने लवकर लक्ष घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विषय समजुन घेवुन सविस्तर मार्गदर्शन केले.

 लवकरच समाजातील आरक्षण प्रश्नाविषयी समाजातील विधिज्ञ व आरक्षणाचा अभ्यास असणाऱ्या तज्ञ मंडळींची मुंबई येथे बैठक घेण्याचे ठरले.  

या बैठकीस निवृत्त अन्नसुरक्षा अधिकारी शंकर राठोड, तांडा सुधार समितीचे अशासकिय सदस्य विलास राठोड,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषेराव राठोड, माजी नगरसेवक निरंजन राठोड, शेषेराव चव्हाण, दामाजी राठोड, वसंत पवार, प्रवीण पवार,  शिवाजी राठोड, देविदास राठोड, पत्रकार शिवाजी नाईक, अतुल राठोड, सचिन राठोड, सतीश राठोड, रमेश राठोड, शिवाजी जाधव, दिनेश राठोड, भूषण पवार , अतुल चव्हाण, भुषण पवार, मनोज चव्हाण यांच्यासह बंजारा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top