मातीतील कुस्तीची जागा  मॅटने घेतल्याने स्पर्धेच्या युगात महाविद्यालयीन  विद्यार्थीनीचाही नावलौकिक - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

नळदुर्ग,दि.११: प्रा.डॉ. दिपक जगदाळे 

 तांबड्या मातीत रांगडे खेळाडू तयार करणारा खेळ म्हणून कुस्ती या खेळाकडे पाहिले जाते. कालांतराने महाविद्यालय स्तरावर बदल होऊन मातीतील कुस्तीची जागा  मॅटने घेतल्यामुळे महाविद्यालयीन स्तरावर देखील चांगले कुस्तीपटू तयार होत असल्याचे मत बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले. 
नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि ११ ते १३ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नळदुर्ग येथील महाविद्यालयात मुलां-मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागाच्या पदवीधर  मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ विभागाचे क्रिडा संचालक डॉ. सचिन देशमुख, महाराष्ट्र राज्य ऑलंपिक संघटना उपाध्यक्ष डॉ चंद्रजित जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेती कु गौरी शिंदे ,डॉ. सचिन सलामपुरे हे उपस्थित होते . 

या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व प्रतिमा पुंजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील, डॉ अशोक कदम, डॉ. शिवाजी घोडके , डॉ. हंसराज जाधव यांनी केले. 

याप्रसंगी पुढे बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले कि , ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रतिवर्षी आम्ही विद्यापीठ स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करत असतो यावेळी आम्ही मुलां-मुलींच्या कुस्ती स्पर्धा घेण्याचे आयोजन केले. यामागील प्रमुख उद्देश म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खेळाकडे आकर्षित करणे हा आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमातूनच आमच्या महाविद्यालयात चांगल्या दर्जाचे खेळाडू  तयार झाले व त्यांनी आमच्या महाविद्यालयाचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध खेळांच्या माध्यमातून झळकावून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला.

या कार्यक्रमास बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा अणदुरचे सरपंच रामचंद्र आलुरे, उपाध्यक्ष डॉ अभय शहापूरकर, संचालक बाबुराव चव्हाण, कोषाध्यक्ष अँड.प्रदिप मंटगे, सहसचिव शहबाज काझी, लिंबराज कोरेकर,  जेष्ट कुस्तीपटू महादेवप्पा आलुरे , मैनोद्दीन शेख, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, नवाज काजी, सुधीर हजारे, इमाम शेख, अझहर जहागिरदार, सौ सुभद्रा मुळे, सौ कल्पना गायकवाड, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर , शहर अध्यक्ष संतोष पुदाले , डॉ अंकुश कदम, प्रा. संभाजी भोसले , प्राचार्य डॉ संजय कोरेकर, प्राचार्य डॉ मोहन बाबरे, पत्रकार विलास येडगे, सुहास येडगे, तानाजी जाधव , शिवाजी नाईक, सुनील बनसोडे, उत्तम बनजगोळे, अमर भाळे,आयुब शेख , शिवाजी वऱ्हाडे, माजी सरपंच धनराज मुळे, प्रभाकर मुळे, शरणप्पा कबाडे, अमर नरवडे, सुंदर जवळगे, मार्तंड मोकाशे, दिपक घोडके, महादेव मुळे यांच्यासह  गावातील व परिसरातील कुस्तीचे जाणकार गावातील नागरीक व महाविद्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top