नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची आज बैठक
नळदुर्ग,दि.१२:
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रविवारी प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडणार असून निवडणुकीची रणनीती ठरवून भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे.मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून गेल्या आठवडा भरापासून सर्वच प्रभागात व नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरु आहे.अनेक उमेदवार संपर्कात असल्याने स्वतंत्र निवडणूक लढणार कि कोणासोबत युती ,आघाडी करणार यासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिका-यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या अनेक वर्षांपासून नागरी प्रश्न घेऊन आंदोलन,मोर्चे काढून विषय मार्गी लावल्याचे सर्वश्रूत आहे. नियोजित नळदुर्ग तालुक्याचे प्रश्न लावुन धरले. अप्पर तहसील कार्यालय ,उपजिल्हा रुग्णालय, रस्ते, शौचालय (प्रोत्साहन) अनुदान,स्ट्रीट लाईट यासह अनेक विषय हाती घेत शहरवासियांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे मनसेची निवडणुकीतील कामगिरी कशी असेल हे येणाऱ्या काळात पालिका निवडणुकीत मनसेचं इंजिन धावणार का हे स्पष्ट होईल.