रवी महाराज राठोड  यांचा सोशल मीडियावर विजयाच्या चर्चा जोरात; नळदुर्ग नगरपालिका निवडणूक २०२५

नळदुर्ग,दि.१२:

नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने शहरातील विविध प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी नाराजी अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. 

प्रभाग क्रमांक ०१ वसंतनगर ,दुर्गानगर  येथिल मतदारांची संख्या २ हजर २४ इतकी असुन या प्रभागाची सीमा पुढीलप्रमाणे आहे. उत्तरेस सर्व्हे नंबर २९५ व नगरपरिषद हद्द., पूर्वेस नगरपरिषद हद्द ते बोरीधरण ते आश्रम शाळा ते वसंतनगर स्मशानभूमी ते शिवाजी राऊत शेड ते खंडोबा मंदिर, दक्षिणेस गोलाई ते दुर्गानगर पाठीमागील शौचालय ते आश्रम शाळा रोड ते  सर्व्हे नंबर २९५ व नगरपरिषद हद्द असे आहे.

मात्र प्रभाग क्रमांक १ मध्ये आरक्षण हे (अ) महिला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर (ब ) सर्व साधारण जाहीर झाल्याने स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे . या प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या जोरावर ओळख निर्माण केलेले व गोरगरिबांचे कैवारी म्हणून परिचित असणारे रवी महाराज राठोड  यांचे नाव आघाडीवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
सर्वसामान्य कुटुंबातील व धार्मिक , सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच राठोड हे अग्रेसर असल्याचे सर्वश्रुत आहे.

तसेच कसलाही राजकीय वारसा नसलेला युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून रवी महाराज राठोड यांची लोकमान्यता प्रचंड असल्याची दिसत आहे. नागरिकांच्या लहानसहान अडचणींपासून ते शिक्षण, आरोग्य, लग्नसमारंभ, पोलिस ठाण्याच्या तक्रारींपर्यंत प्रत्येक ठिकाणी ते स्वतः धावून जातात.नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी  ते दिवस रात्र  उपलब्ध होणारे  म्हणून त्यांची खास ओळख निर्माण झाली आहे. यामुळे शेतमजुर , सामान्य कष्टकरी नागरिक यांच्यात  राठोड विशेष  लोकप्रिय असल्याने भावी नगरसेवक म्हणुन चर्चा रंगली आहे.


आरक्षण जाहीर होताच नागरिकांनी ही देवाची कृपा असल्याची भावना व्यक्त केली. “आजपर्यंत राठोड यांनी केलेले सामाजिक कार्यच त्यांच्या विजयाची पोथी आहे,” असे मत  नागरिकांनी  बोलताना सांगितले .

 त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, कष्टकरी नागरिकांच्या अडचणी सोडवणे अशा विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे मतदारांचा  त्यांच्यावर विश्वास असुन ते प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास नागरिकांतुन व्यक्त होत आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभागात राठोड यांच्या विजयाच्या चर्चांना सुरुवात झाली असून प्रभागात उत्सवाचे वातावरण आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिलीप कुमार राठोड, वसंतनगर

मतदारांनी या प्रभागातून बंजारा समाजाचे दोन नगरसेवक निवडून देतात. यापूर्वी येथील दोघांना नगराध्यक्ष म्हणून पद भुषविता आले. मात्र म्हणावे तसे या प्रभागातील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. त्याकरिता नव्या युवकांना संधी देण्याची गरज आहे. 

गणेश मानसिंग राठोड, वसंतनगर 

अनेक दशकापासून वसंतनगर , दुर्गानगर मधील गोरगरिबांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला राहत्या घर जागेची नगरपालिकेच्या दप्तरी नोंद होऊ शकली नाही. त्याचबरोबर जनता दरबार होऊनही येथील समस्या अद्यापही सुटलेल्या नसल्याने मतदारात नाराजी आहे.
 
Top