मतदाराचा प्रभागातील ठोस रहिवाशी पुरावा बघुनच स्थलांतरीत करण्याचे नळदुर्ग न.प. मुख्याधिकारी यांना रिपाइंचे निवेदन 

नळदुर्ग,दि.१४:

नळदुर्ग शहरातील मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये स्थलांतरीत करत असताना त्या मतदाराचा प्रभागातील ठोस रहिवाशी पुरावा बघुनच स्थलांतरीत करण्याबाबतचे निवेदन रिपाइंचे (आठवले) नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दि.१४ ऑक्टोबर रोजी दिले आहे.

 नुकतेच प्रकाशित झालेल्या मतदार यादी नुसार हरकती नोंदवित असताना बऱ्याच मतदाराने आपापल्या सोई नुसार एका प्रभागातून आपल्या सोईच्या प्रभागातील मतदार यादीत नाव स्थलांतरीत करावे किंवा नोंदवावे अशी मागणी केली आहे.

या मागणी संदर्भात विचार करत असताना जर मतदाराने प्रकाशित प्रभागातील मतदार यादीतील नाव रद्द करून दुसऱ्या प्रभागामध्ये नाव नोंदणी करावे अशी शिफारस केली असता त्या मतदाराचे नाव त्यांनी सांगितलेल्या प्रभागात त्याचे मुळ वास्तव्य आहे का? वास्तव्याचा पुराव्याचा पंचनामा करताना शासनाच्या धोरणानुसार पुरावा म्हणून कुटूंब प्रमुखाच्या नावे नळ पट्टी, लाईट बिल, आधार कार्डवरील पत्ता वगैरे ठोस पुरावा दिला तरच त्याचे नाव त्यांनी सुचविलेल्या प्रभागामध्ये नोंदवावे अन्यथा आहे त्याच प्राभागामध्ये कायम करण्याची मागणी करण्यात आली आहे. न.प.चे कार्यालयीन अधिक्षक खलील शेख यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष मारुती खारवे, अरुण लोखंडे, एस.के.गायकवाड, महादेव कांबळे आदी उपस्थित होते.
 याची एक प्रत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

मतदान कार्ड एका प्रभागाचा आणि मतदारांचे नाव दुसऱ्या प्रभागात असल्याने मतदारातुन निवडणुक प्रकियाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. 
 
Top