नळदुर्ग : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी ; बसवराज धरणे यांच्या समाज कार्याविषयी नागरिकात रंगली जोरदार चर्चा
नळदुर्ग, दि.१४ : शिवाजी नाईक
नळदुर्ग नगरपरिषदेच्या आगामी होणा-या निवडणुकीसाठी राजकीय हालचालीना वेग आला आहे. येथिल अध्यक्षपद हे सर्वसाधारण असल्याने माजी नगरसेवक तथा भाजपचे बसवराज धरणे यांच्या उमेदवारीबाबत नागरिकात चर्चेला उधाण आले आहे.
बसवराज धरणे हे सामाजिक कार्य, रुग्णसेवा आणि जनसंपर्क यामध्ये नेहमीच पुढाकार घेताना दिसुन येतात. नागरिकांशी संवाद साधत ते समाजातील विविध घटकांशी जोडले गेले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्वधर्मियात प्रभावी युवक नेतृत्व म्हणून बसवराज धरणे हे आलीकडे उदयास आल्याचे सर्वश्रुत आहे.
सन २०१० मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत शहर युवक अध्यक्ष पदांची जबाबदारी दिली. त्यांनी युवकासाठी प्रभावीपणे सक्रिय काम केले. त्यानंतर मागील २०१६ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत बसवराज धरणे हे प्रभाग क्रमांक ४ मधुन निवडणुक लढवुन भरघोस मतांनी विजयी झाले. नगरसेवक म्हणून त्यांनी विकास कामाबरोबरच सामाजिक उपक्रमांवर अधिक भर दिला.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत तुळजापूर तालुक्याचे युवक नेते सुनील चव्हाण यांच्यासमवेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केले. भारतीय जनता पार्टीच्या नळदुर्ग मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली . आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकास कामाला गती देण्याचे काम केले. आगामी नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून बसवराज धरणे यांना उमेदवारी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण पुरुषासाठी सुटल्याने अनेक मातब्बराचे ( माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, शहबाज काझी, नय्यर जहागिरदार, निखिल घोडके, ज्ञानेश्वर घोडके इत्यादीसह अनेक जण ) नाव याठिकाणी पुढे येत आहे. पण गेल्या काही वर्षांपासून आपल्या नेतृत्व व कर्तुत्वाने एक वेगळी ओळख निर्माण करणारे बसवराज धरणे यांच्या मागील कार्याविषयी सध्या शहरात जोरदार चर्चा होत आहे.
धरणे यांनी अनेक सामाजिक उपक्रमातुन वेगवेगळ्या माध्यमातून नळदुर्गची सेवा केल्याने युवकात त्यांची लोकप्रियता आहे.
रक्तदान शिबिरच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले तर कोरोना काळात किराणा किट वाटप, उपजिल्हा रुग्णालयात गादी वाटप, दिर्घकाळ गोशाळेतील गाईंसाठी चारा दिले.हे सर्व त्यांनी स्वखर्चाने केले आहेत. तसेच अनेक गरजूंना त्यांनी सर्वतोपरी मदतही केल्याचे सर्वश्रुत आहे.
---------
नळदुर्ग नगरपरिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी दुसऱ्यांदा आरक्षित झाले आहे.
या निवडणुकीत १० प्रभागातुन नगरपरिषद अध्यक्षपदासह २० नगरसेवक निवडले जाणार आहेत.यासाठी एकूण १८ हजार ३४१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदान वाढणार आहे.