नंदगाव जिल्हा परिषदेसाठी माजी उपसरपंच सोमनाथ गुड्डे उमेदवारीसाठी इच्छुक; प्रबळ दावेदारीने राजकीय वातावरण ढवळणार.!
नळदुर्ग,दि.२१: शिवाजी नाईक
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने उमेदवारीसाठी इच्छुक सरसावले आहेत.
नंदगाव गट जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून दहिटण्याचे माजी उपसरपंच सोमनाथ गुड्डे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून
उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे.
त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात असून, कार्यकर्त्यांसह समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्याची रणनीती आखत आसल्याची चर्चा रंगली आहे.
सोमनाथ गुड्डे हे दहिटणा येथिल रहिवासी असुन गावच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. गावात रस्ते ,पाणी,यासह विविध कामे केली आहेत. गेल्या निवडणुकीत नंदगाव गटातुन निवडणुक लढविली होती. त्यावेळी अतिशय कडवी झुज त्यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी दोनदा उपसरपंचपद भुषविले . दहिटणा गावामध्ये अंडर ग्राउंड गटारी, पिण्याचे पाणी, वीज, सिमेंट काँक्रीटचे रस्ते असे अनेक विकासकामे त्यांच्या कालावधी मध्ये झाल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
नंदगाव जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये ते नेहमीच विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून संपर्कात आहेत .तरुणांना क्रिकेटसाठी मदत करणे, झाडे लावणे, महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप , यात्रेत सहभाग, महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी मदत, आरोग्यासाठी गोरगरिबांना आर्थिक मदत करणे, सैनिक ,महिलासह समाजातील अनेक मान्यवरांचा गौरव त्यांनी केले आहे . "जनशुभदा फाउंडेशनच्या" माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा कला, विज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.
एक नवीन चेहरा , सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत लोक कल्याणकारी कार्यक्रम राबवत असल्याचे सर्वश्रुत आहे.आगामी होणा-या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवुन ग्रामीण भागाचा विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.