बातमीच्या कारणावरुन पत्रकारावर हल्ला ; गुन्हा दाखल करुन एकास अटक
नळदुर्ग,दि.२४ :
नेताच्या बातम्या का लावत नाही या कारणावरुन पत्रकारास मारहाण करत तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना नळदुर्ग शहरात दि.२१ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.
अझहर मैनुद्दीन शेख, वय ३८ वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.तर आयुब अब्दुल गणी शेख, वय ३५ वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर असे जखमी पत्रकाराचे नाव आहे.
दि.२१ रोजी ३ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील बसस्थानका जवळ गौरी हॉटेल समोर यातील आरोपीने नेताच्या बातम्या का लावत नाही, या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,चाकुने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद आयुब शेख यांनी दि.22. 10.2025 रोजी दिल्याने अझहर शेख याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिसात भा.न्या.सं.कलम 109, 115(2), 352, 351 (2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत .