♦️हेच आमचा  नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतील उमेदवार राहणार ;  मतदार आक्रमक , शहरवासीयासह राजकीय पक्षांचे वेधले लक्ष♦️ 

नळदुर्ग,दि.२९: शिवाजी नाईक 

कसलाही राजकीय वारसा नाही, लोकांच्या मदतीसाठी कधीही अहोरात्र धावुन जाणारे, आपल्या कार्य कृतत्वाने लोकप्रियतेचे शिखर गाठणारे श्री रवी महाराज राठोड यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने नागरिक आपल्या समस्या, अडचणी घेऊन येतात. राठोड  हे वैयक्तिक कामे बाजूला ठेवून लोकांच्या समस्या अडी आडचणी सोडविण्यास प्रथम प्राधान्य देतात.त्यामुळे रवी महाराज राठोड हेच आमचा  नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतील उमेदवार राहणार अशी जोरदार चर्चा दुर्गानगर -वसंतनगर प्रभागात होत आहे.

 सर्वसामान्य कुटुंबातील एका सामान्य युवकाने सामाजिक बांधिलकी जोपासत युवकांच्या सहकार्याने अनेक सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताचे कार्य करुन सर्वाना आपला हक्काचा माणुस म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या नळदुर्ग (वसंतनगर ) शहरातील श्री रवी महाराज राठोड  हेच आपल्याला न्याय देतील, ख-या अर्थाने लोकांचे वर्षानुवर्ष रखडत पडलेले विविध प्रश्न, समस्या सोडवत विकासाला चालना मिळेल 
अशी पक्की धारणा नागरिकातुन व्यक्त केली जात आहे. या भागातुन निवडून गेलेले लोकप्रतिनिधी त्यांच्याच पक्षाच्या पदाधिका-यांचे साधे फोन उचलत नाही.तिथे नागरिकांचे ग-हाणे  कोणाला सांगायचे  असे  प्रतिप्रश्न नागरिक विचारत आहेत.

सध्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत.वसंतनगर दुर्गानगर प्रभाग क्रमांक ०१ मध्ये २ हजार २४ एवढी मतदारांची संख्या आहे. येथील आरक्षण अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , ब)  सर्वसाधारण असे आहे. काळ बदलला तसा पुर्वीचा मतदार आता बदलत असल्याचे दिसत आहे. सुज्ञ झालेला मतदार आक्रमक होत आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी वसंतनगर, दुर्गानगर प्रभागात  पुढाकार घेत असल्याच्या चर्चेने राजकीय पक्षांसह शहरवासियांचे लक्ष वेधले आहे.

👉 रवी महाराज राठोड 

दरम्यान आपण लोकांच्या आग्रहास्तव होणारी नगरपालिका निवडणुक लढविणार आहे . आरक्षण सोडत झाल्यापासून कांही राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणुक लढविण्यासाठी संपर्क करत आहेत. याविषयीचा निर्णय प्रभागातील मतदार ठरवणार आहेत.जे निर्णय घेतील ते आपणास मान्य आहे.  असे "तुळजापूर लाईव्ह" शी बोलताना रवी महाराज राठोड यांनी सांगितले.
 
Top