गणेश रंगनाथ  गायकवाड  अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग २ मधुन भाजपाकडून ईच्छुक 

नळदुर्ग,दि.२८:

मागील चार दशकापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ शिलेदार रंगनाथ गायकवाड (बाबू टेलर) यांचे चिरंजीव गणेश रंगनाथ  गायकवाड हे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग दोन मधून भाजपाकडून नळदुर्ग नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. 

  भाजपा मंडळ अध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांचे कट्टर समर्थक असलेले गणेश गायकवाड हे प्रभाग दोन मध्ये सक्रिय आहेत. बाबू टेलर यांच्या जनमानसातील प्रतिमेचा वापर करून त्यांचा सामाजिक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी इंदिरानगर येथील नागरिकांची सेवा करण्यासाठी मला एक संधी द्या अशी भावनिक हाक गणेश गायकवाड यांनी इंदिरानगर येथील मतदारांना दिली आहे. अठरापगड जातींची मोट बांधून इंदिरानगर भागातील पायाभूत सुविधासह तरुणांसाठी ठोस काम करण्याचा मानस गणेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. केंद्रात नरेंद्र मोदीजी व राज्यात देवाभाऊ यांच्या विकास कार्याचा लाभ होईल. 

 वडील बाबू टेलर यांच्या एकनिष्ठतेचा भारतीय जनता पार्टी कडून प्राधान्याने विचार होऊन मला भाजपाकडून तिकीट मिळेल व मी विजयी होईन याची खात्री असल्याचे गणेश गायकवाड यांनी आवर्जून सांगितले.
 
Top